मन मोकळं करायचं असेल तर स्वतःशीच एकांतात संवाद करावा …उत्तर सापडत असतं…!
कारण शंभर टक्के आपलं ऐकून समजून घेणारं मन …एखाद्या मनासाठी जणू अस्तित्वातच नसतं… !
क्वचितच एखाद्या मनाला असं मन गवसतं …जे प्रत्येक्ष आपल्याच मनाची प्रतिमा असतं…!
अशीच आज भरल्या घरात सारं भौतिक सुखवैभव असूनही अशांत शारदा एकटीच देव्हाऱ्यापुढे बसून देवाशी भांडत होती, रडत होती ,बोलत होती….!
“देवा, का मला जन्माला घातलय रे…काय साध्य करायचं होतं तुला माझ्या या आयुष्यातून”…प्रत्येकाचे जन्माचे विधिलिखित मांडलेले असते…पण मला कळतच नाही मी काय कसं वागू ..सर्वांच्या मनासारखं, हवं नको पुरवण्यातच दैनंदिन आयुष्य चाललय…पण मलाही मनातनं काही जाणीवा आहे ,जरा काही निवांतपण, काही हवंय का, हा विचारच नाही करत कोणी घरात…!
आणि जसं मला आयुष्य जगायचं होतं तसं मला वास्तव जगणं नाही दिलस रे ,मग विचार करायची बुद्धी तरी का दिलीस रे?…मंदच ठेवायचस ना..घुम्याबैलासारखं कामच करत रहायला…!
नियतीने बांधून टाकलय कि मीच स्वतःला गुंतून घेतलय या चौकटविचारात हेच कळेना झालय बघ..!…पुर्ण हरल्यासारखं भासतय…कितीही पुढेपुढे करा सर्वाच्या जो तो आपलंच वर्चस्व गाजवतो…मग मी नेमकी कुठल्या कर्तव्यात कमी पडतेय सर्वाचा ओरडा खायला… जरा काही बिनसलं कि सोपीच शारदा….! बर ते जावुदे…मला सांग देवा …का असमाधानी,एकाकी दिसतोय प्रत्येक व्यक्ती घरातही, बाहेरही….समाजातही..ही शोकांतिकाच आहे रे…तुझ्या बनवलेल्या दुनियेतली…!
का कशासाठी ..मनशांतीच्या सुखासाठी कि हळव्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी … प्रत्येक मन अशा मनाच्या शोधात असते, जे दोन कान आणि एक मन पुर्णपणे आपल्या मनाला समजु शकेन ..सगळं मनातलं सुखदुःख वेदना ऐकून जाणून घेवू शकेन..! पण सहजासहजी नाही भेटत असं दुर्मिळ निर्मळ मन ..ही व्यवस्थाही तु करून ठेवलीय ना…!
म्हणून असं मन तुजपाशीच आहे रे म्हणून तर बोलावसं वाटतं तुझ्याकडेच…





